
भोरकर अनुभवतायेत धुक्याची दुलई
भोर : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून दररोज पहाटे धुके पडत असल्यामुळे आणि वातावरणात बोचरी थंडी असल्यामुळे नागरिकांना हिवाळी पर्यटनाचा आनंद मिळत आहे. दररोज सकाळी आपण महाबळेश्वर किंवा थंड हवेच्या ठिकाणी असल्याचा भास निर्माण होत आहे. रात्रीपासूनच दव पडत असून हवेतील आर्द्रता कमी होत आहे, त्यामुळे बोच-या थंडीतही कमालीची वाढ होत आहे. शनिवारी रात्रीपासून धुके जाणवत होते, रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत शहर व तालुक्यात सर्वत्र धुक्याची दुलई होती. दाट धुक्यात पाच फूटांच्या अंतरापलीकडे दिसत नसल्यामुळे पहाटे फिरायला जाणा-या नागरिकांच्या आणि सकाळी शाळा-महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांच्या मनात भिती निर्माण होत आहे.
हेही वाचा: गोविंद मोकाटेंविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा
तालुक्यात चार-पाच दिवसांपासून पाऊस सुरु आहे. धुके व पावसामुळे कांदा व डाळींबाच्या पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. मात्र धुके आणि सकाळी पडत असलेले दव हे रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाच्या पिकांना पोषक असल्याचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी सांगितले.
Web Title: Bhorkar Feels The Fog
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..