भोसरीकरांनी अनुभवला थरार

भोसरीकरांनी अनुभवला थरार

Published on

भोसरी, ता. २३ : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धकांचे टेल्को रस्त्यावरील इंद्रायणी कॉर्नरला दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी आगमन होताच नागरिकांनी जल्लोष करत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी दुपारी एकपासूनच टेल्को रस्ता, इंद्रायणी स्वीट कॉर्नर, स्वामी समर्थ शाळा, साई चौक, श्री तिरुपती बालाजी चौक, यश गार्डन, सबडिस्ट्रिक सर्कल, संतनगर चौक आदी भागांत गर्दी केली होती. सायकल स्पर्धक जवळ येताच जल्लोष करत शुभेच्छांसह सायकलपट्टूंचे मनोधैर्य वाढविले. अवघ्या काही सेकंदांत वाऱ्याच्या वेगाने डोळ्यांसमोरून पुढे जात असलेल्या सायकल शर्यतीचा थरार नागरिकांनी अनुभवला. दरम्यान, स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेले सत्तर वर्षीय हौशी सायकलप्रेमी भाऊ जौंजाळे ऊर्फ नेटकऱ्यांचे ‘आप्पा’ हेदेखील भोसरी परिसरात सायकलपटूंच्या स्वागतासाठी उपस्थित होते. नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com