भोसरीत रिक्षांमुळे कोंडीत भर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

भोसरी - येथील बीआरटीएस टर्मिनलजवळील रस्त्याच्या दोन पदरी भाग खासगी प्रवासी रिक्षांनी व्यापला आहे. त्यामुळे कोंडी होत असून, संबंधित चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

भोसरी - येथील बीआरटीएस टर्मिनलजवळील रस्त्याच्या दोन पदरी भाग खासगी प्रवासी रिक्षांनी व्यापला आहे. त्यामुळे कोंडी होत असून, संबंधित चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी भोसरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी बीआरटीएस टर्मिनलजवळील अस्ताव्यस्त थांबत असलेल्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, ॲपे रिक्षा, सहा आसनी रिक्षांसह इतर खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई करून हा रस्ता मोकळा केला होता. तसेच पीएमपीएमएल बससाठी बॅरिकेट लावून मार्गही तयार केला आहे. मात्र, पीएमपीएमएल बसथांब्याच्या पुढे तीन आसनी रिक्षा अस्ताव्यस्त थांबतात. याच ठिकाणी बीआरटीएसचे टर्मिनल असल्याने एक पदरी भाग या बससाठी राखीव आहे. त्यामुळे इतर वाहनांसाठी येथे रस्त्याचा एक पदरी भागच शिल्लक राहिला आहे. याच रस्त्यावर कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ हातगाडीवाले आणि पथारीवाले यांचे अतिक्रमण आहे. या ठिकाणी खरेदीसाठी येणारे ग्राहक, प्रवाशांची संख्या मोठी असल्याने रस्ता गजबजलेला असतो. त्यामुळे कोंडीत भर पडते. या रस्त्यावर अनधिकृतपणे थांबत असलेल्या खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.

Web Title: Bhosari Rickshaw Traffic