भुईंज पाचवड बाजारपेठ परीसरात एकही स्वच्छतागृह नाही

भुईंज पाचवड बाजारपेठ परीसरात एकही स्वच्छतागृह नाही

Published on

पाचवड-भुईंज बाजारपेठेत नागरिकांची कुचंबणा

सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव; ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी

भुईंज, ता. १ : भुईंज-पाचवड ग्रामपंचायत हद्दीत वेगाने विकसित होत असलेल्या पाचवड फाटा व भुईंज प्रभागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची गंभीर कमतरता भासत आहे. मोठी लोकसंख्या आणि गजबजलेली बाजारपेठ असूनही पाचवड परिसरात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने नागरिक, व्यापारी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

सध्या भुईंज गावातील बसस्थानकात एक आणि पाचवड बसस्थानकात एक अशा केवळ दोन स्वच्छतागृहांचीच व्यवस्था आहे. मात्र, भुईंजमधील स्वच्छतागृह कार्यालयीन वेळेतच खुले असते. त्यामुळे इतर वेळी प्रवासी, व्यापारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांची कुचंबणा होते. पाचवड बाजारपेठ व्यापारीदृष्ट्या अत्यंत गजबजलेली असून, येथे महिलांसह ग्राहकांची सतत वर्दळ असते. मात्र, या ठिकाणी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने विशेषतः महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरवर्षी ‘स्वच्छता अभियान’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. जनजागृतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही प्रत्यक्ष गरज असलेल्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही तातडीने स्वतंत्र व आधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची मागणी केली आहे.

भुईंज व पाचवड ही दोन्ही गावे राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. भुईंज येथे वाई तालुक्याच्या पूर्व भागातील, तर पाचवड येथे जावळी तालुक्यातील प्रवासी गावी जाण्यासाठी उतरतात. लांब पल्ल्याचा प्रवास करून आलेल्या प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने उड्डाणपुलाखालील जागेचा आधार घ्यावा लागतो, ही बाब चिंताजनक आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन दोन्ही बाजारपेठांमध्ये सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे.

चौकट
उड्डाणपूल झाले स्वच्छतागृह
भुईंज व पाचवड ही गाव महामार्गावर असून, या दोन्ही बाजारपेठेतील बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ कायम सुरू असते. भुईंजला वाई तालुक्याच्या पूर्व भागातील व पाचवडला जावळी तालुक्यातील प्रवासी गावी जाण्यासाठी उतरत असताना अवेळी लांब पल्ल्याचा प्रवास करून आलेल्या प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृह सापडत नसल्याने नागरिकांना नाइलाजास्तव आहे. प्रात:विधीसाठी उड्डाणपुलाखालील जागेचा आधार घ्यावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com