

सुरूरमध्ये तरुणांकडून गावठी पिस्तूल जप्त
भुईंज पोलिसांची कारवाई; रात्रगस्तीवेळी संशयित ताब्यात
भुईंज, ता. २९ ः सुरुर (ता. वाई) येथे महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली रात्रगस्तीवेळी एका संशयित तरुणाकडून भुईंज पोलिसांनी ४५ हजारांचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्रसाद शुक्राचार्य बागल (वय २२, रा. सुरुर, ता. वाई) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री अडीच वाजता सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व पोलिस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलिस शिपाई सोमा बल्लाळ, सागर मोहिते हे कवठे (ता. वाई) गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक ताटे यांना माहिती मिळाली, की सुरूर हद्दीत उड्डाणपुलाखाली प्रसाद बागल हा तरुण कमरेला पिस्तूल लावलेली आहे. त्यानंतर हवालदार कोलवडकर यांनी दोन पंचांना बोलावून घेतले व त्याठिकाणी जाऊन खात्री केली. त्यावेळी तरुण संशयितरीत्या उभा असलेला दिसला. त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. याप्रकरणी संशयितावर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची चार दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
कारवाईत पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, वाईचे पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक पूनम झगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलिस शिपाई सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते यांनी सहभाग घेतला. तपास सहायक पोलिस निरीक्षक आकाश मोरे करीत आहेत.
-------------------------
01531
भुईंज ः पिस्तूलप्रकरणी संशयितासमवेत पृथ्वीराज ताटे, पूनम झगडे, नितीन जाधव, सूरज शिंदे, आकाश मोरे, आप्पा कोलवडकर, चंद्रकांत भोसले आदी.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.