भुईंज जेष्ठ नागरिक संघटनेचा वर्धापनदिन उत्साहात

भुईंज जेष्ठ नागरिक संघटनेचा वर्धापनदिन उत्साहात

Published on

भुईंज ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात

भुईंज, ता. ४ : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम उत्साहात झाले. आचार्य भृगुऋषी मठ येथे सकाळी १० वाजता झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, मान्यवर व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तणावमुक्ती या विषयावरील महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते अशोक देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सकारात्मक विचार, निरोगी जीवनशैली आणि आनंदी वृत्ती यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना नवी ऊर्जा मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था लि., वाईच्या अध्यक्षा अनुराधा कोल्हापुरे या होत्या. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे समाजाला दिशा मिळते, असे सांगत संघाच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ. सुरभी भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या युवक-युवती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमानिमित्त भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने आयोजित मोफत आरोग्य शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष रामदास जाधव, उपाध्यक्ष जगनाथ दगडे, सचिव अशोक चव्हाण, तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था लि. वाई व भुईंज प्रेस क्लब यांचे विशेष सहकार्य लाभले.

-----------------------------------

1457
भुईंज ः येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित डॉ. सुरभी भोसले- चव्हाण, अनुराधा कोल्हापुरे, रामदास जाधव, जगन्नाथ दगडे आदी.

------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com