Pune News : भूमी ग्रीनच्या ५०० टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी; विरोधकांच्या गदारोळात प्रस्ताव बहुमताने मंजूर

उरुळी देवाची-फुरसुंगी येथील कचरा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम ‘भूमी ग्रीन’ कंपनीला देण्याचा प्रस्ताव मंजूर.
garbage depot

garbage depot

sakal

Updated on

पुणे - उरुळी देवाची-फुरसुंगी येथील कचरा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम ‘भूमी ग्रीन’ कंपनीला देण्याचा ५७७ कोटी रुपयांचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या बहुमताने मंजूर करण्यात आला. विरोधकांनी निविदेतील अटी, एका कंपनीला मिळणारे प्राधान्य आणि महापालिकेवर पडणारा आर्थिक भार यावरून जोरदार आक्षेप घेतले. मात्र, प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतर विरोधकांच्या तिन्ही उपसूचना १०९ विरुद्ध ३६ मतांनी फेटाळण्यात आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com