महिलादिनी माळीनगरात भूमिजा महिला मंडळाचे उदघाटन
MLG26B03204
माळीनगर (ता. माळशिरस) : महिलादिनानिमित्त एकत्र आलेल्या भूमिजा महिला मंडळाच्या सदस्या.
माळीनगरमध्ये महिला मंडळाचे उद्घाटन
..........
माळीनगर : महिलादिनाचे औचित्य साधून माळीनगरमध्ये भूमिजा महिला मंडळाचे उद्घाटन सरपंच अनुपमा एकतपुरे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात आला. डॉ. उषा पवार (शैक्षणिक), डॉ. शाहीन शेख(वैद्यकीय), सुनीता एकतपुरे (व्यावसायिक), नूतन एकतपुरे (आधुनिक शेती), कल्पना देशपांडे (आध्यात्मिक), चांदणी वजाळे(ग्रामपंचायत), प्रियांका वावरे (महिला बालकल्याण अधिकारी), सारीका एकतपुरे (कृषी अधिकारी), भक्ती जाधव (वन अधिकारी) या महिलांना गौरविण्यात आले. भूमिजा महिला मंडळाच्या अध्यक्षपदी कल्पना देशपांडे व खजिनदारपदी भक्ती जोशी यांची यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली. भक्ती जोशी यांनी मंडळाची स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. कल्पना देशपांडे यांनी मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. इयत्ता सातवीमध्ये शिकणारा स्वराज अमित सावंत याने महिलांविषयी केलेल्या भाषणास महिलांनी दाद दिली. जयश्री ढगे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

