
लोणावळा : लोणावळ्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण सोमवारी (ता. १६) सकाळी ओसंडून वाहू लागले. लोणावळा परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे डोंगर दऱ्यातील धबधबे, ओढे नाले खळाळून वाहू लागले आहेेत. सोमवारी लोणावळ्यात सकाळी १४३ मिलिमीटर तर एकूण ७९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.