

पुणे : जमिनीच्या वादातून बिबवेवाडीतील एका शेतकऱ्याचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना खडकवासला परिसरातील सांगरूण गावात घडली. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण ऊर्फ नाना पांडुरंग मानकर (वय ७३, रा. लोकेश सोसायटी, बिबवेवाडी) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत नारायण मानकर यांचा मुलगा नीरज मानकर (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सतीश विठ्ठल खडके (वय ३५, रा. सांगरूण, ता. हवेली) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.