esakal | परदेशी चलन देण्याचा बहाणा करुन नागरीकांना लूटणाऱ्या टोळीला बिबवेवाडी पोलिसांकडुन बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

परदेशी चलन देण्याचा बहाणा करुन नागरीकांना लूटणाऱ्या टोळीला बेड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) चलन स्वस्तामध्ये उपलब्ध करून देण्याचा बहाणा करुन शहराच्या वेगवेगळ्या भागातील नागरीकांची फसवणूक करून लूटणाऱ्या टोळीला बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीनी पुण्यात आत्तापर्यंत आठ ते दहा जणांना लूटले असून अन्य राज्यातही गुन्हे केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

मोहंम्मद उबईदुल्ला मुदसेर शेख (वय ३०), पाखी सुबान मलीक (वय २७, दोघेही रा. काळेपडळ, मूळ पूर्व दिल्ली), बाबू फुलमिया मुल्ला (वय ३२, रा. बंगळुरू, कर्नाटक), उस्मान मुतलिफ अली (वय २७, रा. हैदराबाद), मोहंम्मद कामरान खान (वय २८,रा. सय्यदनगर, मूळ रा. बिहार), रिदोई रहीम खान (वय २३, रा. सय्यदनगर, मूळ रा. दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.बिबवेवाडी येथील एका व्यवसायिकाला कमी किंमतीमध्ये "यूएई"चे चलन दीरहम देण्याच्या आमिषाने तीन लाख रूपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने बिबवेवाडी पोलिस या टोळीच्या मागावर होते.दरम्यान, ही टोळी शहरातील एका व्यक्तीला फसविणार असल्याची माहिती बिबवेवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधत टोळीला बेड्या ठोकल्या. त्यांनी आत्तापर्यंत या आठ ते दहा गुन्हे केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीविरुद्ध लोणींकद पोलिस ठाण्यात एक, तर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा: हरयाणा सरकार शेतकऱ्यांसमोर झुकलं; भात, बाजरीची खरेदी प्रक्रिया उद्यापासून

आरोपीचा महाजन नावाचा म्होरक्या आहे. तो आरोपीना आपल्यासमवेत घेऊन महाराष्ट्रासह अन्य राज्यात ही या पध्दतीने गुन्हे करत आहे. श्रीमंत व्यक्तिना गाठत त्यांना दीरहमच्या बदल्यात भारतीय चलनाचे पैसे देण्याचे ते आमिष दाखवित होते. प्रत्यक्षात रोख रक्कम पैसे घेऊन नागरीकांना साबणाच्या वडीला कागद गुंडाळून ते नोटा असल्याचे भासवून देत असे. पुण्यात टोळीने आठ ते दहा जणांची फसवणूक केली आहे.आरोपींना चार ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

loading image
go to top