Pune Accident
sakal
पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. अपघातानंतर घटनास्थळावरून वाहन चालक पसार झाला आहे. नितीन वसंत कांबळे (वय ४४, रा. भीमदीप वसाहत, बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सचिन कांबळे (वय ४५) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.