बिदालमध्ये आज तोरण मारणे स्पर्धा

बिदालमध्ये आज तोरण मारणे स्पर्धा
Published on

बिदालमध्ये आज
तोरण मारणे स्पर्धा

दहिवडी, ता. १६ : बिदाल (ता. माण) येथे नागपंचमी सणानिमित्त उद्या (सोमवार) बैलाच्या तोरण मारण्याच्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे स्पर्धेचे ४५ वे वर्ष आहे. प्रथम तीन क्रमांकांसाठी अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार आणि २१ हजार रुपये व चषक आकर्षक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ही स्पर्धा सकाळी अकरा वाजता भैरवनाथ मंदिर बिदाल येथे सुरू होईल. बाहेर गावावरून येणाऱ्या बैलांना आयोजकांकडून टोपजोडी देण्यात येईल.
प्रथम क्रमांकाला जय विजय गणेश मंडळाकडून तर प्रथम तीन क्रमांकांसाठी शिवाजी जगदाळे यांच्याकडून चषक देण्यात येणार आहेत. समालोचक म्हणून सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक धनंजय जगदाळे व किशोर इंगवले हे काम पाहतील.
....................................

Marathi News Esakal
www.esakal.com