esakal | मोठ्यांना लाभ, लघुउद्योगांची अवस्था ‘जैसे थे’
sakal

बोलून बातमी शोधा

Industry

‘राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामुळे मोठ्या उद्योगांना लाभ होणार आहे. मात्र, लहान उद्योगांची अवस्था ‘जैसे थे’च राहणार आहे. बेरोजगारांबद्दल स्वागतार्ह भूमिका आहे. बंद उद्योगधंदे सुरू करण्यासाठी शाश्‍वत योजना हवी होती. परंतु, अर्थसंकल्पाने छोटे उद्योजक, रोजगार वाढीला चालना मिळू शकेल,’’ अशा संमिश्र प्रतिक्रिया कामगार व उद्योग-व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.

मोठ्यांना लाभ, लघुउद्योगांची अवस्था ‘जैसे थे’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामुळे मोठ्या उद्योगांना लाभ होणार आहे. मात्र, लहान उद्योगांची अवस्था ‘जैसे थे’च राहणार आहे. बेरोजगारांबद्दल स्वागतार्ह भूमिका आहे. बंद उद्योगधंदे सुरू करण्यासाठी शाश्‍वत योजना हवी होती. परंतु, अर्थसंकल्पाने छोटे उद्योजक, रोजगार वाढीला चालना मिळू शकेल,’’ अशा संमिश्र प्रतिक्रिया कामगार व उद्योग-व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन - रोजगार उपलब्ध करण्यासाठी अगोदर उद्योगधंदे उभे करावे लागतील. सरकारने शहरी आणि ग्रामीण भागांतील बंद उद्योग सुरू करण्यासाठी विशेष योजना घोषित करायला हवी होती. त्याने उद्योगाला पोषक वातावरण निर्माण झाले असते. शासकीय आणि ग्रामपंचायतींच्या करात सवलत दिल्यास उद्योग निर्मितीला चालना मिळेल. अर्थसंकल्पाचा मोठ्या उद्योगांना लाभ होणार असून, लघुउद्योगांची अवस्था जैसे थे राहील.

ॲड. अप्पासाहेब शिंदे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज - उद्योगांच्या वीजदेयकामध्ये कपात, मुद्रांक शुल्कात एक टक्के सवलत, कुशल कामगार निर्मिती, शेतकऱ्यांसाठी सौरपंप आणि कर्जमाफी, अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी ५० कोटी रुपये, शहर, ग्रामीण भागासाठी पायाभूत विकास आदी तरतुदी स्वागतार्ह आहेत. परंतु, पेट्रोल-डिझेलवरील करवाढीमुळे औद्योगिक मंदीत भर पडेल. ग्रामीण उद्योगवाढीला विशेष धोरण नाही. मात्र, एकंदरीत उत्पन्नवाढ आणि सुधारणावादी अर्थसंकल्प आहे.
  
संतोष संचेती, माजी अध्यक्ष, आयसीएआय (डब्ल्यूआयआरसी) पिंपरी-चिंचवड शाखा - अर्थसंकल्प संतुलित आणि शेती प्रधान आहे. पुणे रिंगरोडमुळे रोजगार निर्मिती होऊ शकेल. मुद्रांक शुल्कातील एक टक्के सवलत बांधकाम क्षेत्रासाठी स्वागतार्ह आहे. परंतु, सध्याच्या अडचणीच्या काळात ऑटोमोबाईल उद्योगाला अप्रत्यक्ष मदत मिळणे अपेक्षित होते.

loading image