पीएमपी बससेवेचा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

पुणे रेल्वे स्थानकावरून 
सुरू असलेले मार्ग - कात्रज, एनडीए, निगडी, भोसरी, हडपसर, वाघोली 
नव्याने सुरू होणारे मार्ग - अप्पर इंदिरानगर, सुखसागरनगर, कोथरूड
मागणी असलेले मार्ग - आंबेगाव, बावधन, विमाननगर, मार्केट यार्ड, वानवडी, गोकुळनगर, उंड्री-पिसोळी.

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावरून सुरू झालेल्या रात्र बससेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मार्गांचा विस्तार करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. प्रतिबस सुमारे ५०-६० टक्‍क्‍यांहून अधिक प्रवासी पीएमपीला मिळू लागले आहेत.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराच्या विविध भागांत जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून पीएमपीने नुकतीच बससेवा सुरू केली. प्रतिबसला सुमारे ५०-६० टक्‍क्‍यांहून अधिक प्रवासी मिळत आहेत. त्यामुळे प्रत्येक बसचे एका फेरीचे उत्पन्न ५ ते ६ हजार रुपयांवर पोचले आहे. रात्री बारा ते पहाटे सहा दरम्यान ही बससेवा सुरू केली आहे. शहर वाहतूक पोलिसांनीही पीएमपीच्या या निर्णयाचे स्वागत केले. ही बससेवा या पुढील काळातही वाढत्या संख्येने सुरू ठेवण्यात यावी, अशी अपेक्षा शहर पोलिसांनी ट्विटद्वारे नुकतीच व्यक्त केली.

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून सुरू झालेल्या रात्र बससेवेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. नव्या बस, चालक-वाहक पुरेशा संख्येने उपलब्ध झाल्यास शहर, परिसरातील विविध मार्गांवर बस सोडल्या जातील.
- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big decision on PMP bus service