
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील सर्व व्यापारी, बाजार समिती उपबाजारात येणारे शेतकरी, हमाल, मापाडी, हॉट स्पॉट गावातील नागरिक यांची अँटिजेन टेस्ट करण्याचा, कोरोना लसीकरण केंद्र वाढवण्याचा व ओझर येथील कोरोना उपचार केंद्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या आढावा बैठकित घेण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या बाबत उपाययोजना करण्या संदर्भात आज येथील शासकीय विश्रामगृहात आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत कोविड १९ आढावा बैठक घेण्यात आली.
बरेच यूजर्स कमी ब्राइटनेस, जीपीएस आणि डेटा बंद करून बॅटरी वाचविण्याचा प्रयत्न करतात. वाचा सविस्तर
बैठकीला प्रांत अधिकारी सारंग कोडलकर,पोलीस उपअधीक्षक मंदार जावळे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शाम बनकर, गटविकास अधिकारी शरद माळी, हेमंत गरिबे, सभापती विशाल तांबे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विकास दरेकर, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, सूरज वाजगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ आदी उपस्थित होते.
या वेळी तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या, कोरोना लसीकरण,कोविड केअर सेंटर, हॉट स्पॉट गावे, प्रशासना समोरील अडचणी या बाबतचा आढावा आमदार बेनके यांनी संबधीत विभागाचे अधिकारी यांच्याकडून घेतला. आमदार बेनके म्हणाले तालुक्यात दहा मोठ्या गावातील रुग्ण संख्या वाढत आहे. त्या दृष्टीने व्यापारी, दुकानातील कर्मचारी, जुन्नर बाजार समितीच्या पाच उपबाजारात येणारे शेतकरी, व्यापारी, अडते,हमाल, मापाडी व तालुक्यातील हॉट स्पॉट गावातील सर्व नागरिक यांची अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लेण्याद्री येथील कोरोना उपचार केंद्रात रोज पाचशे रुग्णांची अँटिजेन टेस्ट केली जात आहे. वाढत असलेल्या रुग्ण संख्येचा विचार करुन ओझर येथील कोरोना उपचार केंद्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या साठी आवश्यक असलेली औषधे, मनुष्यबळ, रुग्णवाहिका, वीज,पाणी आदींची तयारी सुरू केली आहे.कोरोना लसीकरण व कोरोना रुग्णांची वाहतूक यासाठी बावीस रुग्णवाहिका तैनात ठेवल्या आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिक व व्यापारी यांनी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे.
बरेच यूजर्स कमी ब्राइटनेस, जीपीएस आणि डेटा बंद करून बॅटरी वाचविण्याचा प्रयत्न करतात. वाचा सविस्तर
कोरोना लसीकरणाची केंद्र वाढविणार : आमदार बेनके म्हणाले सध्या तालुक्यात बारा प्राथमिक आरोग्य केंद्र, जुन्नर ग्रामीण रुग्णालय व पाच खाजगी रुग्णालयात रोज सुमारे बावीसशे जेष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील बावीसशे नागरिकांना लसीकरण केले जात आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अठरा लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार आहे, या बाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवला आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.