Pune Water Cut schedule : पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर

पुणे शहरात महापालिकेने सोमवारपासून (ता. १५ मे) पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे वेळापत्रक केले जाहीर.
Pune water shortage

Pune water shortage

sakal

Updated on

पुणे - शहरात महापालिकेने सोमवारपासून (ता. १५ मे) पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एका पाण्याच्या टाकीचे दोन भाग केले असून, त्यात सम तारखेला एका भागाला तर विषम तारखेला दुसऱ्या भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणी कपात लागू केल्यानंतर त्यातील त्रुटी दूर होण्यासाठी एक आठवडा लागणार आहे, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com