मूळ बिहारचा राजगुरुनगरमध्ये झाला मृत्यू: मग अंत्यसंस्कार...

राजेंद्र सांडभोर
Thursday, 16 April 2020

कोरोनामुळे एकंदर जनजीवन विस्कळीत झाले आहे. बांधकाम मजूर म्हणून थोड्या दिवसांपूर्वीच 'सेझ' परिसरात आलेल्या, ज्ञानचंद शिवजतन शाह (वय ५२, सध्या रा. कनेरसर,ता. खेड, मुळ रा. भोजपूर , बिहार) यांचे पायाच्या दुखापतीच्या आजाराने १३ एप्रिल रोजी निधन झाले. चांडोली ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन झाले.

राजगुरुनगर : परप्रांतीय नागरिकाचा मृत्यू झाला. मात्र, लॉकडाऊनच्या काळात मृत्यू झाल्याने अडचणी समोर होत्या. तसेच मृताचा एकही नातेवाईक हजर नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार करायचे कसे असा प्रश्न पडला होता. मात्र, केवळ मानवतेच्या भावनेतून राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा यांनी एका परप्रांतीय नागरिकावर अंत्यसंस्कार केले.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनामुळे एकंदर जनजीवन विस्कळीत झाले आहे. बांधकाम मजूर म्हणून थोड्या दिवसांपूर्वीच 'सेझ' परिसरात आलेल्या, ज्ञानचंद शिवजतन शाह (वय ५२, सध्या रा. कनेरसर,ता. खेड, मुळ रा. भोजपूर , बिहार) यांचे पायाच्या दुखापतीच्या आजाराने १३ एप्रिल रोजी निधन झाले. चांडोली ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन झाले. पण मृतदेह कोणाकडे सोपवायचा हा मोठा प्रश्न होता. कारण त्यांचा एकही नातेवाईक येथे नव्हता. सर्व नातेवाईक बिहार येथे होते. तसेच लॉकडाऊनच्या परिस्थितीत इतक्या दूर मृतदेह नेणे शक्य नव्हते.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी, अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कासवा यांना या घटनेची माहिती दिली. कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या कासवा यांनी स्वतः ही जबाबदारी घेतली. शासनाचे संबंधित अधिकारी व आरोग्य विभागाची परवानगी घेऊन त्यांनी कायदेशीर सोपस्कार पार पाडले. त्यानंतर कासवा यांनी केवळ तीन जणांच्या साथीने, शाह यांच्यावर, येथील अमरधाम स्मशानभूमीत, गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले.
#Lockdown2.0 : गायत्रीने केले वडिलांचे घरीच केशकर्तन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihars Citizen Funeral held in Rajgurunagar

टॉपिकस
Topic Tags: