नसरापूर - कापूरव्होळ- भोर रस्त्यावर दुचाकी आणि मोटारीच्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुभम राजेंद्र पवार (वय २७), असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून कुणाल जालिंदर खोपडे, असे जखमी तरुणाचे नाव आहे. दोघेही आळंदे (ता. भोर) येथील रहिवासी आहेत.