
शिरूर : शिरूर शहर व परिसरातून दूचाकी चोरींचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने सापळा लावून एका दूचाकीचोराला पकडले. त्याच्याकडून पाच दूचाकी जप्त करण्यात आल्या असून, इतर चोऱ्यांतील काही मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.