

PNE26W62651
मुंबई ः नाट्यपरिषद करंडक एकांकिका स्पर्धेत सांघिक तृतीय पारितोषिक मिळविलेल्या सारडा महाविद्यालयाच्या ‘बिन रंगाची गोष्ट’ या एकांकिकेतील एक प्रसंग.
‘बिन रंगाची गोष्ट’ला पाच परितोषिके
अहिल्यानगर, ता. ३१ ः अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या नाट्य परिषद करंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ‘बिन रंगाची गोष्ट’ या एकांकिकेला सांघिक तृतीय क्रमांकाच्या ५० हजार रुपयांच्या पारितोषिकासह पाच पारितोषिके प्राप्त झाली आहेत, अशी माहिती हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अनंत देसाई यांनी दिली.
मुंबई येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीच्या वतीने राज्यभरात भव्य खुली नाट्यपरिषद करंडक एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत राज्यातील आठ केंद्रांमधून जवळपास अडीचशे एकांकिकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या नगर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत सारडा महाविद्यालयाच्या ‘बिन रंगाची गोष्ट’ या एकांकिकेने प्रथम स्थान पटकावत अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला. अंतिम फेरीमध्येही मोठे यश संपादन करत या एकांकिकेला पाच पारितोषिके मिळाली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेते प्रशांत दामले, स्पर्धेचे परीक्षक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री शिल्पा तुळसकर आणि शरद पोंक्षे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण झाले. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी गौरी डांगे यांनी ही एकांकिका लिहिलेली असून, दिग्दर्शन महाविद्यालयाचा विद्यार्थी निरंजन केसकर यांनी केले आहे. या नाटकाची मूळ संकल्पना ही अमोल साळवे यांची आहे. या विद्यार्थ्यांना नाट्य परिषद उपनगर शाखेचे अध्यक्ष आणि महाविद्यालयातील प्रा. प्रसाद बेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष ॲड. अनंत फडणीस, मानद सचिव सुमतीलाल कोठारी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके आदींनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.