कास - रोहोटचे वनपाल राजाराम काशीद यांची चौदा पुस्तके होणार प्रकाशित...

कास - रोहोटचे वनपाल राजाराम काशीद यांची चौदा पुस्तके होणार प्रकाशित...

Published on

साताऱ्यातील जैवविविधतेची पुस्तके प्रकाशित करणार

गणेश नाईक, राजाराम काशीद यांच्याकडून विविध माहितीचे संकलन

कास, ता. २८ ः सातारा तालुक्यातील निसर्गरम्य अशी नैसर्गिक पर्यटन स्थळे तेथील जैवविविधता, औषधी वनस्पती यांची माहिती, तसेच वन परिमंडळ रोहोट येथील सविस्तर माहिती येथील वनपाल राजाराम काशीद यांनी संग्रही केली आहे. या माहितीची १४ पुस्तके महाराष्ट्र शासन प्रकाशित करणार आहे.
सातारा तालुक्यातील रोहोट येथील वनपाल राजाराम काशीद यांची १४ पुस्तके वन विभागाच्या जैवविविधता या विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासन प्रकाशित करणार आहे, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी राजाराम काशीद यांना मुंबई येथे मंत्रालयात भेटी प्रसंगी दिले. राजाराम काशीद हे रोहोट येथे वनपाल म्हणून कार्यरत असून, १९ वर्षे ते वन विभागात कार्यरत आहेत. त्यांनी निसर्ग संपन्न सातारा तालुका, आशिया खंडातील सर्वात उंच भांबवली वजराई धबधबा, औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग, जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ कास पठार भाग एक व दोन, फुलं झाडे, फळझाडे, पालेभाज्या, फळभाज्या यांचे औषधी उपयोग, नियतक्षेत्र डिस्कळ पुस्तक, वनपरिमंडळ रोहोट पुस्तिका, कास पठार टिप्पणी, भांबवली वजराई धबधबा टिप्पणी, रोहोट परिमंडळ टिप्पणी, कास पठारावरील जैवविविधता, रोहोट परिमंडळ नमुना नंबर एक पुस्तक अशी पुस्तके लिहिली असून, या पुस्तकांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशन होणार आहे. या पुस्तकातून महाराष्ट्राला सातारा जिल्ह्याची नैसर्गिक वनसंपदा, तसेच येथील पर्यटन निसर्ग यांची सविस्तर माहिती या पुस्तकातून मिळेल, अशी अपेक्षा वनपाल राजाराम काशीद यांनी व्यक्त केली.

04648
मुंबई ः कास पठार परिसरातील जैवविविधतेची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांना देताना वनपाल राजाराम काशीद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com