Biofuel : जैविक इंधन हाच एकमेव पर्याय : नितीन गडकरी

देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘इम्पोर्ट सब्स्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह आणि प्रदूषणमुक्त’ अशा जैविक इंधनाचा (बायोफ्युएल) स्वीकार करणे हाच एकमेव पर्याय.
Biofuel

Biofuel

sakal

Updated on

पुणे - युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. देशाची ८६ टक्के ऊर्जा आयात केली जात असून, त्यासाठी २२ लाख कोटी रुपये परकीय चलन देशाबाहेर जाते.

ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘इम्पोर्ट सब्स्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह आणि प्रदूषणमुक्त’ अशा जैविक इंधनाचा (बायोफ्युएल) स्वीकार करणे हाच एकमेव पर्याय आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. देशातील एकूण वायू प्रदूषणात वाहतूक क्षेत्राचा वाटा ४० टक्के आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com