
पुणे - फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपो येथील कचऱ्याचे जैविक उत्खनन (बायोमायनिंग) करताना हे काम योग्य पद्धतीने केले जात आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) संस्थेची त्रयस्थ संस्था म्हणून काम करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या संस्थेला दीड कोटी रुपये दिले जाणार आहेत.