आज उलगडणार पक्षीजगत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सव सायंकाळी चार वाजता सुरू होईल; तसेच रविवारी (ता. 2) सकाळी साडेसहा वाजता सिंहगड व्हॅली येथे पक्षीनिरीक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. 

पुणे - राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष्य सभागृहात आयोजित पक्षी महोत्सवात शनिवारी (ता. 1) एक माहितीपट आणि तीन तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सव सायंकाळी चार वाजता सुरू होईल; तसेच रविवारी (ता. 2) सकाळी साडेसहा वाजता सिंहगड व्हॅली येथे पक्षीनिरीक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज काय पाहाल? 
- पक्ष्यांचे उडण्याचे तंत्र - मंगेश दिघे (सायं. 4 वा.) 
- महापालिकेचे पर्यावरण अधिकारी दिघे यांचे या विषयावर सादरीकरण 
- पक्ष्यांच्या उडण्याचे तंत्र आणि कारणे 
- या विविध पद्धतींचे पक्ष्यांना होणारे फायदे 

"रेझीलीयंस-फिश ईगल ऑफ नैवाशा', निर्मिती - किरण घाडगे 
- केनिया देशातील "नैवाशा' हे ताज्या पाण्याचे सर्वांत मोठे सरोवर 
- आफ्रिकन मत्स्य गरुडाचा मोठ्या प्रमाणावर अधिवास असलेले ठिकाण 
- बदलत्या वातावरणाचा आणि औद्योगीकरणाचा या अधिवासावर होत असलेला परिणाम 
- मत्स्य गरुडाच्या जीवनशैलीवर होणारा याचा परिणाम 

कोकणातील पक्षीजगत - अक्षय खरे 
-कोकण - जैवविविधतेचा खजिना 
- पक्षीजगतासाठी स्वर्ग 

जगभरातील पक्षी - विक्रम पोतदार 
- सहा खंड आणि दोन ध्रुवांवर असलेल्या पक्ष्यांचे केलेले निरीक्षण आणि फोटो 
- दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird Festival in pune