
पुणे : पक्ष्यांच्या घिरट्यांमुळे प्रवाशांसह विमानतळ प्रशासनही त्रस्त आले आहे. विमानतळ परिसरात वारंवार फटाके फोडूनही पक्ष्यांचा संचार सुरूच आहे. त्यामुळे आता विमानांच्या सुरक्षेसाठी हवाई दलाने मोठा आवाज करणाऱ्या खास बंदुकीचा (झोन गन) वापर सुरू केला आहे.