esakal | सुगरणीच्या खोप्यामागचे गणित काय?
sakal

बोलून बातमी शोधा

सुगरणीच्या खोप्यामागचे गणित काय?

इंदापूर तालुक्यामध्ये चालू वर्षीच्या पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला असून, पक्षांची घरटी बांधण्यााठी चढाओढ सुरु आहे.

सुगरणीच्या खोप्यामागचे गणित काय?

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये चालू वर्षीच्या पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला असून, पक्षांची घरटी बांधण्यााठी चढाओढ सुरु आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये गतवर्षीच्या पावसापेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे.पावसामुळे खरीपाच्या हंगामातील बाजरी, मका, सुर्यफुलाची व इतर पिके ही जोमाने आली आहे.

समाधानकारक पावसामुळे पक्षांना ही खाद्याची मेजवानी मिळत आहे. जून महिन्याच्या सुरवातीपासून पक्षी विणीच्या हंगामासाठी झाडावरती घरटी विण्यास सुरवात करीत असतात. बहुतांश पक्षांनी झाडावर घरटी विणली असून मादी पक्षाला आकर्षित करण्यासाठी सुंदर व लांब घरटी बांधण्याची चढाओढ सुरु आहेत.

तालुक्यामध्ये पक्षांचा सुरु असलेला किलबिलाट शेतकऱ्यांना आनंद देत आहेत. निमसाखर परीसरामध्ये विहिरीजवळच्या झाडावरच्या घरट्यामध्ये पक्षी ये-जा करीत असून सकाळच्या वेळी घरटे बांधण्याच्या कामांना वेग आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पक्षांची घरटी व किलबिलाट पाहिल्यानंतर बहिणाबाई चौधरीची कविता आठविल्याशिवाय राहत नाही. शेतकरी ही बहिणाबाईच्या कविताच्या ओळी गुणगुणत शेतामधील कामे मार्गी लावत आहेत.
 

कविताच्या ओळी...
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !

पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला !

सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर
तिले जाल्माचा संगती मिये गाण्य गम्प्या नर

खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!

तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं ??

loading image