

Birsa Munda Jayanti Tribal Pride Week
घोडेगाव : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधण्याबरोबरच शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.अशी माहिती घोडेगाव (ता आंबेगाव ) येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी गणेश इवनाते यांनी घोडेगाव येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.