बिटलेवाडी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ तर एक दिवशीय यात्रेचे आयोजन

बिटलेवाडी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ तर एक दिवशीय यात्रेचे आयोजन

Published on

बिटलेवाडीत
पारायण सोहळा
खटाव, ता. ४ : बिटलेवाडी (ता. खटाव) येथे शुक्रवार (ता. २७) ते गुरुवार ५ मार्चअखेर अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठ चालक हभप विलास फडतरे महाराज वाकेश्वर, गायनाचार्य आकाश महाराज, प्रसाद महाराज आळंदीकर, मृदंगमणी सूर्यकांत महाराज लावंड खातगुण व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. या सप्ताहात हभप माऊली महाराज रणनवरे (लोणी), हभप रामदास महाराज भाळवणी, हभप वाणीभूषण हनुमंत महाराज चिंचणीकर, हभप अमोल महाराज ढवळी, हभप विठ्ठलस्वामी महाराज वडगाव, हभप हणमंत महाराज रणवरे (निभोरे) यांची कीर्तने होणार आहेत. ५ मार्चला हभप हणमंत महाराज रणवरे निंभोरे यांच्या काल्याच्या कीर्तन व नंतर दिंडी सोहळा आणि महाप्रसाद वाटपाने या पारायण सोहळ्याची सांगता होईल. दरम्यान शुक्रवार (ता. ६) रोजी सकाळी जोतिर्लिंग देवास अभिषेक, धार्मिक विधीवत पूजाअर्चा करून सायंकाळी ७ वाजलेपासून सूरसनई, शिंग तुतारी वाद्यांच्या गजरात, फटाक्याच्या आतषबाजीत व गुलाल खोबऱ्याची उधळण करीत श्री जोतिर्लिंग देवाची पालखीतून भव्य मिरवणूक (छबिना) निघणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com