एकाच वर्षात भाजप सरकारने तीस हजार घरकुलाचा लाभ पालकमंत्री
‘एकाच वर्षात भाजपने दिला
तीस लाख घरकुलांचा लाभ’
मंगळवेढा, ता. १ : राज्याच्या इतिहासामध्ये दहा वर्षांमध्ये दहा लाख २६ हजार इतकी घरकुले मंजूर झाले. मात्र, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असल्यामुळे देवा भाऊच्या प्रयत्नाने एकाच वर्षात तीस लाख घरकुले मंजूर केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ते बोराळे ता. मंगळवेढा येथे बोलत होते. व्यासपीठावर आ. समाधान आवताडे, भाजप तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, दामाजीचे माजी अध्यक्ष शशिकांत बुगडे, विनोद पाटील, बापूराया चौगुले, विनोद पाटील आदीसह भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री गोरे म्हणाले की मंगळवेढ्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम आ. आवताडे यांनी केले असून पाणी प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी न्याय देण्याची भूमिका बजावली. राज्यातील २८८ आमदारांपैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकमेव लाडका आमदार समाधान आवताडे असल्यामुळे तालुक्याला सर्वाधिक निधी रस्ते पाणीपुरवठा बांधकाम या खात्याच्या माध्यमातून देण्याचे काम केले. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून निधी देण्याची जबाबदारी ग्रामविकास खात्याकडे येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाडक्या बहिणीला दरमहा दीड हजार रुपये देऊन मोठा आधार दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

