Shivane Khadakwasla Dhayri Election Result
sakal
पुणे
PMC Election Results 2026 : खडकवासल्यात 'कांटे की टक्कर'! भाजप आणि राष्ट्रवादीने विभागल्या जागा; कार्यकर्त्यांत कुठे जल्लोष तर कुठे अश्रू
Shivane Khadakwasla Dhayri Election Result : खडकवासला प्रभाग ३३ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्यात चुरशीची लढत होऊन दोन्ही पक्षांनी प्रत्येकी २ जागा जिंकत संमिश्र यश मिळवले.
खडकवासला : शिवणे–खडकवासला–धायरी पार्ट (प्रभाग क्र. ३३) मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात चारही जागांसाठी झालेली अटीतटीची लढत अखेर संमिश्र भावनांत संपली. अ आणि क या दोन जागांवर भाजपने विजय मिळवला, तर ब आणि ड या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पारड्यात पडल्या. निकाल जाहीर होताच दोन्ही पक्षांच्या गोटात आनंद आणि दु:ख यांची सरमिसळ पाहायला मिळाली. दोन जागांच्या विजयामुळे जल्लोष झाला, तर हातातून निसटलेल्या दोन जागांमुळे अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

