तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन अश्विनी चिवटे विजय

तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन अश्विनी चिवटे विजय
Published on

लोगो : वीट जि.प. गट
---
KOR26B10603
वीट (ता. करमाळा) : जिल्हा परिषदेत भाजपच्या अश्विनी चिवटे यांचा विजय झाल्यानंतर आनंद साजरा करताना कार्यकर्ते.
---
मजबूत जनसंपर्काचा परिपाक;
अश्‍विनी चिवटेंचे विक्रमी यश
युतीची एकजूट अन्‌ विकासकामांचा फायदा
अण्णा काळे, सकाळ वृत्तसेवा
करमाळा, ता. १२ : वीट (ता. करमाळा) जिल्हा परिषद गटातून भाजपच्या अश्विनी गणेश चिवटे यांनी तालुक्यातील सर्वाधिक ७ हजार ५३४ मतांच्या आघाडीने दणदणीत विजय मिळवला. चिवटे यांना १४ हजार ७३६ मते मिळाली, तर आमदार नारायण पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीच्या उमेदवार रत्नमाला राजेभोसले यांना ७ हजार २०२ मते मिळाली.
गेल्या दोन वर्षांपासून भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी या गटात निवडणुकीची तयारी सुरू ठेवली होती. गटाचे आरक्षण महिला सर्वसाधारण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी अश्विनी चिवटे यांना रिंगणात उतरवले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध गावांतील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत त्यांनी मजबूत जनसंपर्क उभारला होता.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गणेश चिवटे यांनी अपक्ष उमेदवार माजी आमदार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदे व दिग्विजय बागल एकत्र आल्याने शिवसेना- भाजप युतीला बळ मिळाले. माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा पाठिंबा आणि चिवटे यांची गटातील कामे यामुळे विजयाची वाट अधिक सुकर झाली.
विशेष म्हणजे, वीट गावातील स्थानिक उमेदवार असूनही रत्नमाला राजेभोसले यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. उलट अश्विनी चिवटे यांनी वीट गावातूनच ५०० हून अधिक मतांची आघाडी घेतली. गटातील जवळपास सर्वच गावांत त्यांनी आघाडी कायम ठेवत विक्रमी विजय मिळवला.
---
चौकट
वीट जिल्हा परिषद गटातील हिसरे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत अवताडे विजयी झाले. वीट गणातून पूजा ढेरे यांनी मंगल जाधव यांचा ११५३ मतांनी पराभव केला. पंचायत समितीच्या या विजयातही अश्विनी चिवटे यांच्या आघाडीचा लाभ झाल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com