esakal | भाजपकडून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न - सुनील अहिरे
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

भाजप कायमच दलित, आदिवासीविरोधी राजकारण करत आला आहे. आता दलितांना नोकऱ्यांमध्ये असलेले आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सुनील अहिरे यांनी केला.

भाजपकडून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न - सुनील अहिरे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - भाजप कायमच दलित, आदिवासीविरोधी राजकारण करत आला आहे. आता दलितांना नोकऱ्यांमध्ये असलेले आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सुनील अहिरे यांनी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अहिरे बोलत होते. शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड या वेळी उपस्थित होते. केंद्रातील व उत्तराखंड येथील भाजप सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनुसूचित जाती व जमातींच्या नागरिकांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण असले पाहिजे, असे संविधानात लिहिलेले नाही. तसेच, ती सरकारची जबाबदारी नाही, असे म्हटले आहे. न्यायालयानेही हे प्रतिज्ञापत्र स्वीकारणे दुर्दैवी आहे.

loading image