उत्तर सोलापूर तालुक्यात तीन जिल्हा परिषदसाठी 18 तर पण 6 पंचायत समितीसाठी 34 जण इच्छुक

उत्तर सोलापूर तालुक्यात तीन जिल्हा परिषदसाठी 18 तर पण 6 पंचायत समितीसाठी 34 जण इच्छुक

Published on

WDL२६B०२६५४
उत्तर सोलापूर ः भाजपच्या वतीने रविवारी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. माजी आमदार दिलीप माने, यशवंत माने, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, तालुकाध्यक्ष संभाजी दडे, सरचिटणीस विकास वाघमारे, विनायक सुतार यांनी घेतल्या.

उत्तरमधील तीन गटांसाठी १८ जण इच्छुक
भाजपच्या मुलाखती; सहा पंचायत समिती गणांसाठी ३४ जण इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
वडाळा, ता. १८ ः उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सोलापूर शहरातील कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी कोंडी, बीबीदारफळ, नान्नज जिल्हा परिषद गटासाठी एकूण १८ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. तर कोंडी, तिऱ्हे, बीबीदारफळ, मार्डी, नान्नज, वडाळा पंचायत समिती गणासाठी ३४ जणांनी मुलाखती दिल्या.
या मुलाखती भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, बाजार समितीचे सभापती दिलीप माने, माजी आमदार यशवंत माने, तालुका मंडलाध्यक्ष संभाजी दडे, जिल्हा ओबीसीचे अध्यक्ष विनायक सुतार, उपाध्यक्ष अविनाश सिरसट योगेश गवळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या.
दरम्यान, भाजपसमोर दोन्ही राष्ट्रवादीचे आपल्यासमोर आव्हान असणार आहे, असे विचारले असता शशिकांत चव्हाण म्हणाले, आमची स्पर्धा विरोधकांशी नसून आमच्याशीच आहे. आमच्यात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लवकरच याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार आहे. सर्व नेतेमंडळाशी समन्वय साधून उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत

भाजपमधील इच्छुकांची संख्या
जिल्हा परिषद गट
कोंडी (४) ः
बीबीदारफळ (४) ः
नान्नज (१०) ः

पंचायत समिती गण
तिऱ्हे (४) ः
कोंडी (२) ः
बीबीदारफळ (७) ः
मार्डी (११) ः
नान्नज (९) ः
वडाळा (१) ः

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com