‘राज्य जुनी पेन्शन समन्वय’ची कौस्तुभ गावडे यांना साथ

‘राज्य जुनी पेन्शन समन्वय’ची 
कौस्तुभ गावडे यांना साथ
Published on: 

पुणे, ता. ११ : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने साथ देण्याचा निर्णय आज घेतला.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार निरंजन डावखरे, भीमराव तापकीर, संजय जगताप, निवडणूक सहप्रमुख डॉ. प्रशम कोल्हे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद प्रमुख उपस्थित होते. शिक्षक मित्र गावडे हे जुनी पेन्शन प्रश्नी महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे ते नक्कीच जुनी पेन्शनसाठी कार्यरत राहतील, अशी आशा नागपूरचे कडू यांनी व्यक्त केली.
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणाऱ्या शिक्षक आणि कर्मचारी बांधवांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आणि मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, असे गावडे यांनी सांगितले.
यावेळी भरत मोजर, बाबा पाटील, देविदास कठाळे, दत्तात्रेय घुगरे, सुभाष माने, तानाजी माने, नंदकुमार सागर, संजयकुमार झांबरे, प्रसाद गायकवाड, सचिन नलवडे, दत्ता पाटील, संदेश राऊत, विजय येवले, सुधाकर जगदाळे, शशिकांत शिंदे, रामचंद्र मोहिते उपस्थित होते.
....
शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी
निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता, सेवाशर्ती, सामाजिक संरक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याची हमी या मुद्द्यांशी ही मागणी निगडित आहे. त्यामुळे या प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा या समन्वय संघाने व्यक्त केली.
फोटो- 69359

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com