पुणे - दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी वसाहतीमध्ये सुमारे साडे तीन कोटी रुपये मूल्य असलेली इमारत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अवघ्या काही हजार रुपयात देण्यात आली आहे. यात महापालिकेची फसवणूक झाली आहे, असा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते सागर धावडे यांनी केला आहे. तर हे आरोप बिनबुडाचे असल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले आहे.