Pune : गोल्फ क्लब चौकातील पुलाचे काम 75 टक्के पूर्ण, डिसेंबरअखेर पूल वाहतुकीसाठी खुला करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : गोल्फ क्लब चौकातील पुलाचे काम 75 टक्के पूर्ण, डिसेंबरअखेर पूल वाहतुकीसाठी खुला करणार

विश्रांतवाडी : येरवडा येथील गोल्फ क्लब चौकात महानगरपालिके च्या वतीने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, प्रकल्पचे कार्यकारी अभियंता अभिजीत आंबेकर यासह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

या पुलाचे काम 75 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर अखेर पूल वाहतुकीसाठी खुला होईल. पुलाविषयी माहिती देताना माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक म्हणाले, मी स्थायी समिती अध्यक्ष असताना वडगावशेरी मतदार संघात चार उड्डाण पूल मंजूर करून घेतले. त्यापैकी गोल्फ क्लब चौकातील उड्डाणपुलास निधीची तरतूद करून ठेवल्याने पुलाचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेर पूल वाहतुकीस खुला होईल.

याचबरोबर खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर म्हणाले, सदर पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुलाचे अंतर 650 मीटर असून 10 पिलर वर पूल उभारण्यात आला आहे. पुलाची रुंदी 15.6 मीटर असून चार लेन असणार आहेत. पुलाचे काम सुरू होऊन 38 महिने झाले आहेत. कोविडमुळे पुलाचे कामकाज लांबले असून डिसेंबर अखेर पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीस सुरू केला जाईल. शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, वडगावशेरी मतदार संघात ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आपण आमदार असताना महापालिकेमार्फत चार उड्डाणपूल मंजूर करून घेतले.

गोल्फ क्लब चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन आपणच केले असून पूलाचे कामकाज पूर्ण होत आले आहे. पूल वाहतुकीसाठी सुरु झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या काही अडचणी होत्या त्यादेखील सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वेळी माजी नगरसेवक राहुल भंडारे, माजी नगरसेविका श्वेता खोसे-गलांडे, मुक्ता जगताप, संतोष भरणे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष राजगुरू, अन्वर पठाण, किशोर वाघमारे, विकास सोनवणे, सुनील जाधव यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. फोटोओळ : येरवडा येथील गोल्फ क्लब चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करताना शहराध्यक्ष जगदीश मुळीक, योगेश मुळीक व इतर अधिकारी.

टॅग्स :BjpPune NewspuneBridge