कोरोना लढ्यासाठी 'महाविकास आघाडी'नं दिले फक्त तीन कोटी; वाचा कुणी केला आरोप?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जुलै 2020

महापालिकेने आतापर्यंत सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तर राज्य शासनाने केवळ तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ​

पुणे : पुणे शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून तब्बल दोनशे कोटी रुपयांचा खर्च होत असताना, राज्य शासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने महापालिकेला केवळ तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडी आकसाने राजकारण करीत आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. 

'कोरोनाला अजिबात घाबरायचं नाही'; पुणे पोलिसांचा 'मनोभरोसा' देणार दिलासा!

घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण, वैद्यकीय चाचण्या, स्वॅब तपासण्या, अटिंजेन किटचा वापर, कोव्हिड सेंटरची निर्मिती, क्वारंटाईन सेंटरवरील सुविधा, रुग्णालयांतील सुविधा, व्हेंटिलेटर, पीपीई किट, शिधावाटप आणि जनजागृती अशी कोरोना नियंत्रणासाठी लागणारा खर्च महापालिका करीत आहे. तसेच दहा खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठीचा खर्चही महापालिकेला करावा लागत आहे. 

लॉकडाऊनमध्येही 'ते' करत होते दारुची विक्री; तब्बल 'एवढा' मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त!​

या सर्व कामांसाठी महापालिकेने आतापर्यंत सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तर राज्य शासनाने केवळ तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महापालिकेचा आजपर्यंत झालेला खर्च, कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयाची निर्मिती, महापालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या सुविधा निर्माण करणे, त्यासाठी आवश्‍यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, पुढील काळात कोरोनावर नियंत्रण आणणे आदी कामांसाठी राज्य शासनाने पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी मुळीक यांनी केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP city president Jagdish Mulik has accused Mahavikas Aghadi