

पुणेः काँग्रेस नेत्यांच्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजप युवा मोर्चाने शुक्रवारी दुपारी थेट काँग्रेस भवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना विरोध करण्यासाठी काँग्रस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर तळ ठोकला, तर दुसरीकडे काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनीही भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढत जशास तसे उत्तर दिले. दरम्यान, दोन्ही पक्षांनी थेट पक्ष कार्यालयांवर मोर्चा काढल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.