पुणे : भाजप नगरसेविकेच्या पतीचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

भाजपचे कार्यकर्ते राहुल माने यांचे आज पहाटे निधन झाले. अरण्येश्वर भागातील नगरसेविका साईदिशा माने या त्यांच्या पत्नी होत. राहुल यांना शनिवारी दुपारी घरी असताना त्रास होऊ लागला. त्या मुळे साईदिशा यांनी त्यांना पुणे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

पुणे : पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नगरसेविका साईदिशा माने यांचे पती राहुल माने (वय 44) आज (रविवार) पहाटे खासगी रुग्णालयामध्ये निधन झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे कार्यकर्ते राहुल माने यांचे आज पहाटे निधन झाले. अरण्येश्वर भागातील नगरसेविका साईदिशा माने या त्यांच्या पत्नी होत. राहुल यांना शनिवारी दुपारी घरी असताना त्रास होऊ लागला. त्या मुळे साईदिशा यांनी त्यांना पुणे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारादरम्यान रविवारी पहाटे 3.30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

राहुल यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 11.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अरणेश्वर भागातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP corporater Saidisha Mane husband Rahun Mane died in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: