'होय मी सावरकर' पुण्यात झळकले फलक; राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 December 2019

धीरज घाटे म्हणाले, की राहुल गांधी यांनी अत्यंत अपमानास्पद असे वक्तव्य केले आहे. त्यांना देशासाठी सावरकरांचे काय योगदान आहे हे माहित तरी आहे का? सावरकर यांच्याविरोधात असे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही.

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही' असे वक्तव्य केल्याने आज (रविवार) भाजपच्या नगरसेवकांकडून टिळक रस्त्यावरील अभिनव चौकात आंदोलन करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपच्या कसबा मतदार संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सावरकरांच्या वेशभूषेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्याचबरोबर होय मी सावरकर आहे अशा प्रकारचे फलकही झळकावले. राहुल गांधीनी माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांमार्फत करण्यात आली.

निर्दयी बाप! पोटच्या मुलासह पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण 

यावेळी पुणे महानगरपालिकेचे सभागृहनेते धीरज घाटे म्हणाले, की राहुल गांधी यांनी अत्यंत अपमानास्पद असे वक्तव्य केले आहे. त्यांना देशासाठी सावरकरांचे काय योगदान आहे हे माहित तरी आहे का? सावरकर यांच्याविरोधात असे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही.

एकेकाळी 120 किलो होतं वजन; ऑस्ट्रेलियाची स्पर्धा पूर्ण करून बनला 'आयर्नमॅन

त्याचबरोबर कसबा मतदार संघाचे अध्यक्ष राजेश येणपुरे म्हणाले, जे राहुल गांधी यांनी वक्तव्य केले आहे ते देशातील नागरिकांचा अपमान करणारे आहे. त्यांनी अधिक सावरकरांचा अभ्यास केला पाहिजे. यावेळी कसबा विधानसभा मतदार संघाचे सरचिटणीस प्रमोद कोंडरे, नगरसेवक उदय लेले, अप्पासाहेब खेडेकर, नगरसेविका गायत्री खडके, धनंजय जाधव, संजय देशमुख, वैशाली नाईक, अमित कंक अरविंद कोठारी, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP corporaters agitation against Rahul Gandhi in Pune