कष्टकऱ्यांसाठी भाजपने राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी

BJP demands financial package from the state government
BJP demands financial package from the state government
Updated on

पुणे : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे शहरातील पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणारे बारा बलुतेदार, रिक्षाचालक, पथारीवाले अशा हातावर पोट असणाऱ्यांची काम नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्या मुळे त्यांचा उदरनिर्वाहहाचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य शासनाने त्यांना तातडीने आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी स्वरदा बापट यांचा शिष्टमंडळात समावेश होता. नाभिक समाजाचे विनायक गायकवाड, सुनील पांडे, चर्मकार समाजाचे सूर्यकांत भोसले, शिंपी समाजाचे प्रशांत झणकर, तांबट समाजाचे सतीश निजामपूरकर, धोबी समाजाचे प्रकाश अभ्यंकर, भोई समाजाचे श्रीकांत पाटील यावेळी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासदार बापट म्हणाले, 'पुणे शहरात कुंभार, कोळी, चर्मकार, तेली, नाभिक, परीट, माळी, शिंपी, सोनार, चर्मकार, लोहार, कासार अशाप्रकारचे बारा बलुतेदार पारंपरिक पद्धतीने आपले परंपरांगत व्यवसाय करीत आहेत. शहरात अशाप्रकारचे छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या एक लाखांहून अधिक आहे. या व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कारागिरांची संख्याही सुमारे तीन लाख इतकी आहे. म्हणजेच बलुतेदार व्यावसायिक आणि कारागिरांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. त्याबरोबर रिक्षाचालक आणि पथारीवाल्यांची संख्याही मोठी आहे. या सर्वांचे हातावर पोट आहे. रोज काम केले तरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. मात्र गेले तीन महिने लॉकडाउन असल्याने हातात काम नाही. त्यामुळे या सर्व कुटुंबांना रोजच्या गरजा भागविणे अशक्य झाले आहे. म्हणून राज्य शासनाने या सर्वांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे.'

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुळीक म्हणाले, 'हातावर पोट असलेल्या कुटुंबांच्या अन्न, वस्त्र, निवारा अशा दैनंदीन गरजा भागविता याव्यात, आरोग्य विषयक व मुलांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे पॅकेज असावे. तसेच नव्याने व्यवसायाची उभारणी करता यावी यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, सध्याच्या कर्जात सवलत आणि कर्जाची पुनर्रचना आदी आर्थिक पर्याय उपलब्ध करून द्यावेत. तसेच आगामी काळात व्यावसायिक स्पर्धेत टिकता यावे यासाठी स्वयंरोजगार, व्यवसायातील नवीन संधी, तंत्रज्ञान आणि कौशल्ये याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात यावे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून तातडीने राज्य शासनाकडे पाठवावा आणि तो मंजूर करून घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती करण्यात आली. अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येणार आहे.' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com