मसूर : येथील भाजपचे प्रचार सभा
मतदारांनो, भूलथापांना बळी पडू नका
शिवेंद्रसिंहराजे भोसले; मसूर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा
मसूर, ता. ४ : कऱ्हाड उत्तर विभागात आमदार मनोज घोरपडे यांनी विकास केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय ताकदीने आपल्या मागे उभे आहेत. आम्ही विकासकामाला कोठेही कमी पडणार नाही. या भागातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आणि विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी अधिकृत उमेदवारांना साथ द्या. मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता भाजपच्या पाठीशी ताकदीने उभे राहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
मसूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार लालासाहेब जगदाळे, मसूर पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ. संतोष पाटील, तसेच वडोली भिकेश्वर पंचायत समिती गणाच्या उमेदवार कोमल यादव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मंत्री भोसले बोलत होते. या वेळी आमदार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, ज्येष्ठ नेते नंदकुमार जगदाळे, दिनकरराव पाटील, पवन निकम, संपतराव इंगवले, जयवंतराव जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, उमेश साळुंखे, उदय पाटील, प्रशांत यादव, विकास जाधव, युवराज जगदाळे, अक्षय पाटील, ओमकार पाटील, सागर जगदाळे, रवींद्र शहा, व्यापारी संघटनेचे सुमीत शहा आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार घोरपडे म्हणाले, ‘‘मसूर गटातील उमेदवाराला वाटते की मी एकट्यानेच विकासाचा मक्ता घेतला आहे. मात्र, मसूर गटात विकास काय असतो, हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मसूरमध्ये कोट्यवधींची विकासकामे दिली आहेत. आमचे उमेदवार सर्वसामान्यांना संजीवनी मिळेल, असे औषध निर्माण करतात. विरोधी गटाचे उमेदवार संध्याकाळचे औषध विकतात. तेव्हा संसार उद्ध्वस्त करणारे उमेदवार तुम्हाला चालतील काय?’’
जिल्हा परिषदेचे उमेदवार लालासाहेब जगदाळे म्हणाले, ‘‘मसूर जिल्हा परिषद गट आदर्श बनवण्यासाठी आणि पारंपरिक मक्तेदारी मोडून काढण्यासाठी, सर्वसामान्य वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपण निवडणुकीला सामोरे जात आहे. भाजपच्या विकासाचा विजयी रथ याही निवडणुकीत कायम ठेवून विकासाचे नवे पर्व साकारण्यासाठी गट तट, वैयक्तिक हेवेदावे विसरून सर्वांगीण विकासाच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्रित यावे.’’
मसूर : येथील उमेदवाराच्या प्रचार सभेत जमलेली भारतीय जनता पक्ष आणि महायुती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

