

भुलभुलैयात फसाल, तर खऱ्या विकासाला मुकाल
डॉ. प्राची पाटील; रोजगार निर्मितीसह विविध समस्या सोडविण्यासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन
ढेबेवाडी, ता. १ : बेरोजगारी, शेतीसमोरील आव्हाने, माणसाविना ओस पडलेली गावे आणि त्याचा बाजारपेठेवर झालेला गंभीर परिणाम असे अनेक प्रश्न- समस्या विभागात ठाण मांडून आहेत. पाच वर्षांत त्याची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. भूलभुलैयात फसाल, तर खऱ्या विकासाला मुकाल, असे प्रतिपादन प्राना फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. प्राची पाटील यांनी केले.
मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार डॉ. प्राची पाटील, नितीन पाटील, आकांक्षा खेडेकर यांच्या प्रचारार्थ बनपुरी, अंबवडे खुर्द, जानुगडेवाडी येथे आयोजित प्रचार दौऱ्यात त्या बोलत होत्या.
डॉ. पाटील म्हणाल्या, ‘‘जिंकल्यानंतर अनेक जण गुलालामध्ये सामील होतात; परंतु संघर्षाच्या काळामध्ये जे कोणी आपल्याबरोबर असतात तेच निष्ठावंत असतात. निष्ठावंत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज आहोत. ही लढाई पंचायत समिती व जिल्हा परिषदेची नसून आपल्या हक्काची व भविष्याची आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून आगामी काळात भरीव विकास आम्ही करणार आहोत. सामाजिक विकासाचा वारसा असलेल्या कुटुंबातील आम्ही उमेदवार आहोत. भारतीय जनता पक्षातून उमेदवारी मिळणे सहज सोपे नाही. सर्व आलेख तपासला जातो. आमच्यावर टाकलेला विश्वास चांगल्या कामगिरीतून सार्थ ठरवू. देशात, राज्यात तसेच महानगरपालिका व नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा चौफेर विकास सुरू आहे. त्यांचे हात बळकट होण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येणे गरजेचे आहे.’’
नितीन पाटील म्हणाले, ‘‘सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे ध्येय ठेवून आम्ही भाजपात प्रवेश केला आहे. पारदर्शक आणि दर्जेदार विकास कामांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दरवर्षी पाटण तालुक्याला दोनशे कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचा शब्द दिला आहे.’’ यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी पाटील, दीपक महाडिक, पाटण अर्बन बँकेचे संचालक अंकुश मोंडे, बनपुरीचे माजी उपसरपंच शिवाजी पवार, आंबवडे खुर्दचे माजी सरपंच दत्तात्रय पाटील, शंकरराव मोडे, डॉ. गणेश पवार, प्रमोद पाटील, शहाजी भिलारे, बाबा मोकाशी, शिवाजीराव जगदाळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------------------
08069
बनपुरी : प्रचार दौऱ्याप्रसंगी बोलताना डॉ .प्राची पाटील. समवेत मंदाकिनी पाटील, नितीन पाटील, दीपक महाडिक, शिवाजी पवार, दत्तात्रय पाटील व अन्य.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.