BJP
पुणे - भाजपने उमेदवारी निश्चित करताना अनेक प्रयोग केले आहेत. अनेक माजी नगरसेवकांनी घरी बसवले, आमदार, खासदारांच्या नातेवाइकांना कात्री लावली. पण त्याचसोबत अनेक तरुण व नव्या चेहऱ्यांना महापालिकेसाठी संधी दिली आहे. विशेष म्हणजे खुल्या जागांवरही महिलांना प्राधान्य देऊन विरोधकांमधील पुरुषांपुढे आव्हान निर्माण केले आहे. हा बदल कितपत यशस्वी होणार याची उत्सुकता लागली आहे.