

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी
‘भाजप किसान’ची नवी टीम
सोलापूर पूर्वची कार्यकारणी जाहीर; ३४ पदाधिकारी, पाच मंडल अध्यक्षांची नियुक्ती
सोलापूर, ता. १५ : भाजप किसान मोर्चाने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. किसान मोर्चा सोलापूर पूर्वची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. ३४ पदाधिकाऱ्यांसह पाच मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली.
अक्कलकोट येथे ५ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. आमदार व जिल्हा प्रभारी गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजप सोलापूर जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण तसेच जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी आण्णा मोरे, उमेश मळेवाडी, प्रकाश मोहोळकर, विनोद पाटील, श्रीकांत बुरुकुल, बाळासाहेब पाटील व सुधीर मचाले यांचा समावेश आहे. सरचिटणीसपदी नितीन कारंडे व आनंद बुक्कानुरे, तर कोषाध्यक्ष डॉ. राजू काळे आणि मीडिया प्रमुख संजुकुमार जाधव यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, मोहोळसाठी गणेश शिंदे, दक्षिण सोलापूरसाठी माणिकराव देशमुख, उत्तर सोलापूरसाठी नागेश ननवरे, अक्कलकोटसाठी नागराज कुंभार आणि मंगळवेढ्यासाठी आप्पासाहेब पूजारी यांची मंडल अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.