
पुणे : मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे ( वय ७५ वर्षे ) यांचे गुरुवारी दुपारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. भेगडे यांना छातीत दुखत असल्याने गुरूवारी सकाळी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. भेगडे यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ राहिली आहे.
(BJP Leader and former mla digambar bhegade passed away)
हेही वाचा - Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!
मावळ विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी १९९९ व २००४ अशा दोन वेळा विजय मिळवला होता. सांप्रदायिक क्षेत्रात कार्यरत राहिल्याने पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी अशी घोषणा त्यावेळी गाजली होती. त्यापूर्वी त्यांनी मावळ पंचायत समितीचे उपसभापती पद भूषविले होते. त्यांनी भाजप पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केले होते. तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.
ते बैलगाडा शौकीनही होते. त्यांच्या मागे पत्नी, मनोहर व प्रशांत ही दोन मुले, तीन मुली, दोन भाऊ, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे यांचे ते बंधू तर भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे ते चुलते होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.