

Pune BJP
sakal
पुणे : पुणे महापालिकेत भाजपचा गटनेता कोण होईल याबाबत चर्चा होईल असे नवनिर्वाचित नगरसेवकांना वाटले. मात्र, या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी गटनेतेपदावर भाष्य करण्यापेक्षा नगरसेवकांची शाळा घेतली. महापालिकेत कसे कामकाज करावे, प्रस्ताव कसे वाचावेत यावर मार्गदर्शन केलेच, पण त्यासोबत एकमेकांचे पाय ओढू नका, प्रभागात चौघांनीही एकत्रितपणे काम केले पाहिजे. आपल्या पक्षाचे, नेत्यांचे नाव खराब होणार नाही असे वर्तन करा असे सल्ले ही देण्यात आले.