Kasba Bypoll Result : फक्त मोदींच्या नावावर निवडणूक जिंकता येणार नाही, राज्यातील BJP नेत्यांनी धडा घ्यावा...

Kasba Bypoll Result
Kasba Bypoll Result

भाजपला संपूर्ण देशात यश मिळत असल्यामुळे कुठंतरी त्यांच्या डोक्यात हवा गेल्याचे चित्र आहे. मात्र हा हवेचा फुगा कधीही फुटू शकतो. हे भाजपच्या देखील आज लक्षात आलं असेल. प्रत्येक राजकीय पक्षाचे कामे जनतेसमोर असतात. त्यामुळे जनतेला काही माहित नाही, अशी चूक भाजपची झाली. आज कसबा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. भाजपचा पारंपरिक मतदार संघ काँग्रेसने काबीज केला. 

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. धंगेकरांना ७२ हजार ५९९ तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळाली आहेत. साधारण १० हजार ८०० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपला जनतेने व भाजप समर्थकांनी देखील आरसे दाखवायला सुरूवात केली आहे. 

स्थानिक प्रश्न महत्वाचे असताना भाजपने उद्धव ठाकरे, कलम ३७० नेहमीसारखे रटाळवाणे मुद्दे प्रचारादरम्यान मांडले. विरोधी कसे नीच हे दाखवण्याचा प्रयन्त भाजपने केला. पैसे वाटल्याचे व्हिडीओ तर आश्चर्यचकित करणारे होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झाले होते. 

Kasba Bypoll Result
Kasba Bypoll result: रासनेंना तेंव्हाच इशारा दिला होता, पण...; बापटांचं 'ते' विधान चर्चेत

कसब्यात भाजपने अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आजारी असलेले गिरीश बापट यांना मैदानात उतरवले. मात्र तरी देखील भाजपला यश मिळाले नाही. कितीही रथी-महारथी आले तर निवडणूक जनतेच्या हातात होती. कसबा फक्त हिंदूंचा ही भाजपची भाबडी कल्पना फोल ठरली. यावेळी "आमचं हिंदुत्व सर्वसमावेशक आहे," हे धंगेकरांचं वक्तव्य महत्वाचे आहे. त्यामुळे फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर भाजपला यश मिळणार नाही. 

भाजपला सामान्य मतदार देखील लक्षात घ्यावा लागेल. उमेदवार देखील तगडा लागतो. फक्त मोदींचा नावावर प्रत्येक निवडणूक जिंकता येणार नाही. छोट्या-छोट्या निवडणुकीत मोदी-शहांचा उदो-उदो नको. शहा असतील, मोदी असोत यांच्या भरवशावर प्रत्येक निवडणूक जिंकता येणार नाही. भाजपला स्वकर्तुत्व देखील सिद्ध करावे लागेल.

Kasba Bypoll Result
Kasba Bypoll Result: परसेप्शन, फाजील आत्मविश्वास ते फसलेला प्रयोग, कसब्याने भाजपाला शिकवल्या 3 गोष्टी

प्रत्येत वेळी मोदी, शाह, कलम ३७०, राम मंदीर हे मुद्दे मांडले भाजपच्या स्थानिक नेत्यांचे कर्तुत्व काय हा प्रश्न महत्वाचा आहे. मोदी, शाह, कलम ३७०, राम मंदीर हे मुद्दे राज्यातील स्थानिक मतदारसंघाचा विकास करणार आहेत का?, त्यामुळे भाजपला आज आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. आज अर्थसंकल्पिय अधिवेशनात बोलताना फडणवीस यांनी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीचा संदर्भ नाना पाटोले यांना दिला. पण ते तीन राज्य कसब्याचा विकास करणार आहेत का? हा महत्वाचा प्रश्न आहे. स्थानिक मुद्द्यांवर भाजपला विचार-चर्चा करावी लागेल. 

हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून कसब्यात नाराजी होती. ब्राम्हण समाज नाराज होता. तसे पोस्टर देखील कसब्यात झळकले होते. मात्र भाजपने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे भाजपला अतिआत्मविश्वास नडला, हे नक्की!

Kasba Bypoll Result
Chinchwad Bypolls Results : विजयासमीप असलेल्या अश्विनी जगताप म्हणाल्या राहुल कलाटेंमुळे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com