अपयश झाकण्यासाठी भाजपचे नेते शरद पवार यांची बदनामी करु लागले; धनंजय मुंडे

सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेला शरद पवार यांचा तो मूळ व्हिडिओ नसून भाजपच्याच एका नेत्याने कट-पेस्ट आणि एडिटिंग करून जाणीवपूर्वक चुकीचा आणि खोटा व्हिडिओ व्हायरल केला
BJP leaders started defaming Sharad Pawar to cover up failures due to Inflation  Dhananjay Munde
BJP leaders started defaming Sharad Pawar to cover up failures due to Inflation Dhananjay Mundee sakal
Updated on

पुणे : देशात महागाई खुप वाढली आहे. या महागाईमुळे आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपचे नेते जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी ट्विटरच्या माध्यमातून करु लागले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यात शुक्रवारी (ता.१३) एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेला शरद पवार यांचा तो मूळ व्हिडिओ नसून भाजपच्याच एका नेत्याने कट-पेस्ट आणि एडिटिंग करून जाणीवपूर्वक चुकीचा आणि खोटा व्हिडिओ व्हायरल केला असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.

आर्यन्स ग्रुपच्यावतीने पुण्यात मिडिया हाऊस सुरू करण्यात आले आहे. या मिडिया हाऊसचे उद्घाटन शुक्रवारी मुंडे यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंडे म्हणाले, "शरद पवार हे एक अद्वितीय व्यक्तीमत्व आहे. ते देश आणि जगाचे विश्व विद्यापीठ आहेत. धर्म हा काही कोणाही एकाचा नाही. पण भाजपने सध्या धर्माचा बाजार मांडला आहे. याच्या माध्यमातून दोन धर्मांतील वातावरण खराब करायचे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, ही महागाईचे अपयश झाकण्यासाठी भाजपने केलेली खेळी आहे. महागाईचे अपयश झाकण्यासाठी भाजप कुठल्याही स्तराला पोहोचू शकतो, हे या व्हिडिओवरुन स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com